Tuesday, July 13, 2010

नवीन सुरुवात...!!!

काही गोष्टी आपल्या साथी अमूल्य असतात अस मी ऐकल होत, पण कधी त्याबाबतीत स्वानुभव आला नव्हता. माझ्या आयुष्यात अशा खुप कमी गोष्टी आहेत ज्यांच्या साथी मी possessive होऊ शकतो. Blogging ही त्यातलीच एक गोष्ट आहे.


माणसाने लोकांसाठी नाही पण निदान स्वतः साठी तरी रोज diary लिहावी अस नेहमीच म्हटला गेला आहे. माझ्या अवती भवति अशी अनेक माणसे सुद्धा आहेत जी रोज काही नाही प्रकारचा लिखाण करतात. अशा लिखाणाचे अनेक फायदे सुद्धा आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे माणसाला बर्याच वेळेस अवलोकन करायला कुणा दुसर्या तिसर्या व्यक्तीची गरज लागत नाही. माणूस स्वतःच्या स्वतः आपल्या चूका सुधारू शकतो. दूसरा फायदा जो मला सगळ्यात मोठा वाटतो की अशा प्रकारचा लिखाण पुढे चालून छान आठवण म्हणुन लक्षात राहते. पण रोज लिहिण्या इतका मी active सुद्धा नाहिये. मग मधला मार्ग म्हणुन blogs वर्ती नवीन नवीन पोस्ट्स अधून मधून लिहिण्याचा प्रयत्न करत असतो मी.

मी जेव्हा कुठल्याही प्रकारचा लेखन करत असतो तेव्हा माझी साधी अपेक्षा असते ती म्हणजे लोकानी मी केलेल लेखन वाचाव. आणी गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा पासून मी ब्लॉगिंगला श्री गणेशा केला आहे तेव्हा पासून एक गोष्टी जी मला खटकली आहे ती म्हणजे भाषा. माझा मित्र परिवार गेल्या २ वर्षां मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. औरंगाबाद मध्ये माझे mostly मित्र-मैत्रिणी हे महाराष्ट्रियन होते किंवा जे पण अमराठी मित्र होते त्याना मराठी भाषा लिहिता-वाचता येत होती. पण जस मी औरंगाबाद सोडला आणी पाहिले पुणे आणी आता लन्दन इथे माझे मित्र-मैत्रिणी हे अमराठी तर होतेच होते पण काही तर भारतीय सुद्धा नव्हते. जेव्हा केंव्हा ते माझे blogs वाचायचे तेव्हा त्यांची प्राथमिक मागणी इंग्लिश मध्ये लिही हीच होती. ही सगळी म्हणत कोणत्याही पैशाच्या अपेक्षेशिवाय जरी करीत असलो तरी याचा अर्थ  मी वाचाकाना granted समजावा अस तर definitely नव्हता.

इंग्लिश भाषेतले पोस्ट्स लिहिताना सोपे वाटत असतील तरी मराठी मध्ये ल्हिन्याची मजा काही वेगळीच असते. पण मग  अशा परिस्थिति वर तोडगा म्हणुन मी दोन भाषेचे दोन भिन्न blog page ठेवायचा निर्धार केला. आणी तिथून मग ह्या नवीन ब्लॉग ची सुरुवात झाली. या पुढे मी मराठी भाषेतले पोस्ट्स ह्या web page वर लिहिणार आहे,

खरा सांगायचा तर आधी सांगितलेल्या ब्लॉगिंग च्या फायद्यान सोबत माझा थोडा स्वार्थ सुद्धा लपलेला आहे. सध्या माझ  आयुष्य ज्या गति मध्ये जात आहे, त्या गति मध्ये बर्याच गोष्टी हातातून निसटुन जात असल्याची तीव्र भावना मला प्रकर्षाने  जाणवते आहे मला. या ब्लॉग च्या माध्यमातून थोड़े फार क्षण मी अशा प्रकारे नोंदावायचा प्रयत्न करतोय जेणे करून मला हे क्षण पुढे चालुन मला भुतकाळ मध्ये घेउन जातील.

कोणत्याही लेखकाला वाचकांच्या प्रतिक्रियेची का गरज असते हे माझ्या साथी कोडच असायचा. पण स्वतः जेव्हा पासून लिखाण सुरु केला आहे तेव्हा पासून त्याची किम्मत आली आहे मला. त्यामुले आपण आपला मत comments मध्ये नोंद्वुन  माझ स्वागत स्वीकारल अशी अपेक्षा ठेवतो.धन्यवाद्