Friday, June 17, 2011

चौकट........

गेली ३ वर्ष कधी नियमित आणि कधी अनियमितपणे लिहिताना लिखाणाची एक ठराविक पद्धत अंगवळणी पडली आहे. अपेक्षित सुरुवात, ओघम असा मध्य आणि सुनियोजित अंत हा लिखाणचा अलिखित नियम आहे. यामध्ये विनोद, अनुभव, मतभेद आणि अनेक दृष्टीकोन मांडले जातात. मध्यंतरात बरेच वर्तमान पत्रानमधले लेख वाचले, बरीच पुस्तक वाचलीत. एक-दोन वेळेस लिहण्याची सुरुवात करून मध्येच सोडून दिल. माणूस जेव्हा कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा प्राथमिक अवस्थेत गोंधळलेल्या स्थिथीमध्ये इतरांच्या मतांनुसार त्यांच्या सूचनांनुसार बदल करत असतो, आणि मग एकदा आवश्यक अनुभव गवसल्यावर तो स्वयंभू होतो. 

स्वतःला लेखक म्हणून घेणार्याला लोक गुन्हेगार मानतात त्यामुळे ती चूक मी करणार नाही, पण जे थोडाफार मी गेल्या काही वर्षात लिहिला आहे त्याच्या छोट्यामोठ्या अनुभवातून हे लक्षात आलेला आहे कि लेख लिहिणारा लेखक हा फार मोठा विद्वान नसतो. तो त्याच समाजातला असतो ज्यामध्ये इतर लोक राहतात. लेखकाची निराक्षणाची क्षमता हि त्याची लेखनाची खोली ठरवत असते. बर्याच वेळेस तो इतर लोकांच्या अनुभातून काही गोष्टी मांडायचा प्रयत्न करतो, कधी कधी तो स्वतःच्या आयुष्यामधील घटनांवरून मुद्दे मांडतो. सांगायचा मुद्दा म्हणजे जे थोडे फार चांगले-वाईट अनुभव लिहिणार्याच्या आयुष्यात येतात ते तो लोकां सोबत share करायचा प्रयत्न करतो. बहुतेक वेळा लिहितानाची परिस्थिती ही लेखनावर मोठ्या प्रमाणावर influence करते, आणि आजच्या माझ्या लेखावर माझी वर्तमान परिस्थिती बर्यापैकी influenced आहे. 

बर्याच दिवसांनी लिहित असल्यामुळे असेल किंवा वास्तविक आयुष्यामधली नव्याने आगमन झालेली जाचक नियमावली असेल पण मला बंधनांचा राग आला आहे. अनेक वर्ष मोकळ्या आकाशामध्ये भ्रमण केल्यावर पाय बांधल्यानंतर मानसिक समाधानासाठी माणूस हवे तितके पंख फडफडायचा प्रयत्न करतो,आजचा लेख हा असाच एक अपयशी प्रयत्न आहे. आज मला बराच काही बोलायचं आहे बराच काही सांगायचा आहे, मन मोकळं करायचा आहे. सुरुवात आठवत नाहीये आणि अंत अजून झालेला नाही त्यामुळे अपेक्षित अंत तुम्ही करत असाल तर माफी असावी.......  

लहान असताना अश्वथामा ची कथा मी ऐकली होती, असा म्हणतात कि अश्वथामा याला मरण मिळालेला नाही आणि आज सुद्धा तो भटकत असतो. मला स्वतःची तुलना त्याच्याशी करायची नाहीये पण एका प्रकारे माझा आयुष्य काही वेगळा नाहीये. मला सुद्धा काही गोष्टींचा अभय आहे पण त्याच्या बदल्यात अनेक बंधनात अडकलेलो आहे,बंदिस्तपणासाठी कोणी जवाबदार नाही ना आवश्यक मुक्तता ही कोणत्या पोपटाच्या जीवात अडकून आहे. एखाद्या कैदीला तुरुंगाची चावी हातात दिल्यावर निर्णय त्याला घ्यायचा असतो की नेमका पाऊल कोणता घ्यायचा आहे. माझी सुद्धा अशीच कैफियत होत आहे. तुरुंगामध्ये स्वतः अडकलेलो आहे आणि त्याची चावी सुद्धा खिशामध्ये आहे. खरा पाहता बर्याच वेळेस खरा तुरुंग आणि मुक्ती या मधला फरक करणं जरा अवधड असत. आयुष्यामध्ये आपल्या विरुद्ध परिस्थती नेहमीच चांगली वाटते पण वास्तविकता काही वेगळी नसेल याची खात्री करण्यासाठी लागणार बळ हे कमी पडत. 

बराच काही सांगायचा राहिला आहे, बराच काही बोलायचं राहिला आहे, पण आधी सांगितल्या प्रमाणे मला आज नियम तोडायचे आहेत, वाचणार्यांसाठी आणि सगळ्यात महत्वाचा माझ्यासाठी!!!!!!